पु. ल. देशपांडे .net
सारी भूमिती मी इंच-इंच लढवत शिकलो. कंपासमध्ये डिव्हायडर नावाची एक वस्तू असे.
माझ्या आणि गणिताच्या शिक्षणात फूट पाडण्यापलिकडे या डिव्हायडरने काहिही साधले नाही.
(.. पु. लं. चा 'बिगरी' ते 'मॅट्रिक' प्रवास!)
 
मधू गानू विद्यावृत्ती

मधू गानूंच्या पुढाकाराने सुरू झालेल्या 'साहित्य रंगभूमी प्रतिष्ठान' तर्फे सचिन कुंडलकर आणि सतीश मन्वर या दोन युवा कलाकारांना प्रत्येकी एक लाख रुपयांची 'मधू गानू विद्यावृत्ती' प्रदान करण्यात आली. ८ एप्रिल २००६ रोजी पुण्यात ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर, ललित कला केंद्राचे प्रमुख सतीश आळेकर, प्रतिष्ठानचे विश्वस्त अशोक कुलकर्णी व मिनाक्षी गानू यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
ज्येष्ठ कलाकारांच्या कलेचा आस्वाद सगळ्यांना घेता यावा, तरूण कलाकारांच्या कलेला प्रोत्साहन मिळावे, यासाठी कायम धडपडणाऱ्या मधू गानूंच्या नावे झालेला सन्मान, या दोन्ही तरुण रंगकर्मींसाठी नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे.

सचिन कुंडलकर व सतिश मन्वर या दोघांचेही अभिनंदन!

पुणे ८ एप्रिल २००६:

दै.लोकसत्ता
दै.सकाळ
दै.सामना
दै.प्रभात

पुलकित
First time uploaded on 15/04/2001 फाँट मदत आभार Please read:Disclaimer Last time updated on 08/11/2008