पु. ल. देशपांडे .net
मोठेपणा याचा अर्थ लक्षात ठेवला पाहीजे. समाजात मोठेपणा असाच मिळत असतो, कि ज्या
वेळेला लोकांना त्याचं आपण अनुकरण करावं असं वाटतं, त्या वेळेला लोकांनी त्या मोठेपणाला दिलेली ही एक मानवंदना असते.
(.. पु. ल. )
 

... कोणत्याही पोथीनिष्ठ राजकीय, सामाजिक वा आर्थिक विचारव्यूहात पुलंची बुद्धी अडकली नाही की पारिभाषिक संज्ञांच्या विद्वज्जड जंजाळात त्यांची शैली फसली नाही. तो त्यांचा पिंडच नव्हता. समाजजीवनाचा व त्याच्या निरोगी, लावण्यपूर्ण विकासाचा विचार त्यांच्या मनात सतत असे आणि त्यासाठी त्यागपूर्वक झटणाऱ्या कार्यकर्त्यांविषयी व नेत्यांविषयी, त्यांच्या वैचारिक भूमिकांची अटक न मानता, त्यांच्या मनात नितांत आदरभाव असे. त्यातून घोळणारे विचार व भावना त्यांनी वेगवेगळया वेळी, वेगवेगळया निमित्तांनी लिहिलेल्या लेखांत व भाषणांत आपल्या स्वाभाविक, सहज व अतिशय बोलक्या भाषेत व्यक्त केले...

... अपूर्ण(- 'एक शून्य मी'... प्रस्तावनेतील काही भाग)


पुलकित
First time uploaded on 15/04/2001 फाँट मदत आभार Please read:Disclaimer Last time updated on 08/11/2008