|
संगीत हे पु. लं.चे सर्वात पहिले प्रेम होते. साहित्य, सिनेमा, रंगभूमी या
बरोबरच संगीत क्षेत्रालाही त्यांच्या बहुरुपी प्रतिभेचा परिसस्पर्श झालाच
होता!
गायक, हार्मोनियम वादक, संगीतकार म्हणून त्यांनी केलेलं काम त्यांच्या
एकूण साहित्यिक कामगिरीच्या मानाने कमी असलं तरी त्यालाही एक
वेगळा 'पु. ल.'टच होताच! प्रत्येक कलाकृतीत नावीन्य होते, म्हणूनच 'नाच
रे मोरा' आजही टवटवीत वाटतं, 'बाई या पावसानं' पुन्हा पुन्हा ऎकावंसं
वाटतं, आणि पुलंची हार्मोनियम उत्स्फूर्तपणे म्हणायला लावते, 'क्या बात
है!'
पण आता उरल्या आहेत फक्त कॅसेटमधल्या बंद आठवणी! पण आजही त्या
ऎकताना क्षणभर का होईना पु. ल. आपल्यात असल्याची जाणीव करुन
देतात. पु. लं.च्या बहुरुपी व्यक्तिमत्वाचा हा आणखी एक पैलू!
|