अहो ज्ञानियांच्या राजा । कशाला फुकाच्या गमजा?
एकेकाळी रचिली ओवी । व्हाल का हो नवकवी?
मारे बोलविला रेडा । रेघ बी. ए. ची ओलांडा!
तुम्ही लिहावी विराणी । लिहा पाहू फिल्मी गाणी
म्हणे आळंदी गावात । तुम्ही चालवली भिंत
चालवून दाखवा झणी । एक नाटक कंपनी
बाप रखुमादेवीवरा । आमुचा च्यालेंज स्वीकारा |
 |
निळ्या तळ्याच्या
काठावरचा बगळा
एका अपुऱ्या चित्राला
मदत करायला
काळ्या ढगाच्या
दिशेने उडाला...
मी त्या बगळ्याला
'थॅंक्यू म्हणालो.
|
पंचवीस मार्क कमी पडून
नापास झालेले चिरंजीव
तीर्थरुपांना म्हणाले,
'मी पहिल्यापासूनच
मार्क्सविरोधी गटात आहे.
|