|
'आमच्या एका मित्राने आपल्या बायकोच्या पहिल्या डोहाळजेवणाला तिला पातळाऐवजी पु.लं. चे 'हसवणूक' हे पुस्तक दिले.
पुस्तकावर त्याने लिहिले, 'प्रिय .... हिस, तुझ्या पहिल्या दोहदभोजनाप्रसंगी पातळाऐवजी पुस्तक देण्यामागील विशुद्ध हेतू फसवणूक हा
नसून हसवणूक हाच आहे. तुझाच .... !' त्यावर ही मित्रपत्नी चिडली. तिनं थेट पु. लं. कडेच धाव घेतली. पु. लं.नी ही त्याच अर्पण
पत्रिकेखाली स्वाक्षरिनिशी आपल्या मित्राला समजावले, 'आपल्याकडे नवऱ्यानं पत्नीवरील आपलं दाट प्रेम पातळानंच व्यक्त करायचं
असतं, हे विसरायचं नसतं मिस्टर !'
|
'वैद्यकातली एकच गोष्ट या क्रिकेटमध्ये येऊन चपलख बसली आहे. ती म्हणजे त्रिफळा. खेळणारांचे येथे चूर्ण व्हावे. गोट साफ.' - इति पु.ल.
|
साहित्य संघात कुठल्याशा रटाळ नाटकाचा पहिलाच प्रयोग चालू होता. पु. लं. ना आवर्जून बोलावले होते. नाटकाचा पहिला अंक
चालू असतांनाच पडद्यामागे धडाम्कन् काहीतरी पडल्याचा आवाज झाला. शेजारचा घाबरुन पु. लं. ना म्हणाला, 'काय पडलं
हो?''नाटऽऽक दुसरं काय?' पु. लं. उत्तरले.
|