पु. ल. देशपांडे .net
सारी भूमिती मी इंच-इंच लढवत शिकलो. कंपासमध्ये डिव्हायडर नावाची एक वस्तू असे.
माझ्या आणि गणिताच्या शिक्षणात फूट पाडण्यापलिकडे या डिव्हायडरने काहिही साधले नाही.
(.. पु. लं. चा 'बिगरी' ते 'मॅट्रिक' प्रवास!)
 
पुलंच्या निकटवर्तीयांपैकी, पुलंवरील निस्सीम, निस्वार्थ प्रेम, कुठल्याही कामात निरपेक्षपणे झोकून द्यायची वृत्ती यांमुळे आयुष्यभर पुलंच्या जवळ असणारे व नंतरही सुनीताबाईंना मदत करणारे साहित्य प्रेमी मधू गानू यांच्या निधनाला ८ एप्रिल २००६ रोजी एक वर्ष पूर्ण झाले.
समवयस्करांसाठी 'मधू' आणि सगळ्याच लहानांसाठी 'गानू काका' म्हणजे अखंड उत्साहाचे प्रतिक होते. इंटरनेटच्या माध्यमातून त्यांच्या 'भाईं'साठी काहितरी उपक्रम होत आहेत, हजारो लोक दररोज भाईंच्या आठवणी इंटरनेटवर वाचत आहेत, याचे त्यांना केवढे कौतुक वाटे ! वेबसाईटच्या निमित्ताने माझा त्यांच्याशी जवळचा संबंध आला, पुलंच्या आठवणी त्यांच्याकडून अनेकदा तासन तास प्रत्यक्ष ऐकता आल्या, हेच केवढे मोठे भाग्य !
गानूकाकांची प्रत्यक्ष मदत आणि प्रोत्साहन ही खूप मोलाची गोष्ट वेबसाईटच्या प्रत्येक उपक्रमासाठी खूप महत्वाची होती. 'राज्यस्तरीय निबंध स्पर्धांसाठी' बक्षिसांची रक्कम आपण स्वत: द्यायची असे त्यांनी
ठरवले होते. जाता जाता न विसरता तेवढे काम
सुद्धा आपल्यासाठी त्यांनी करुन दिले.
कितीही मोठी रक्कम केव्हाही जमवता येईल. पण काका तुमचे प्रेम, प्रोत्साहन आणि सहवास आता
फक्त आठवणींच्या रुपानीच परत मिळेल. तोच आमच्यासाठी खूप मोठा ठेवा आहे.

हा खास विभाग गानू काकांची आठवण म्हणून...


पुलकित
First time uploaded on 15/04/2001 फाँट मदत आभार Please read:Disclaimer Last time updated on 08/11/2008